कोची बिएनाले : कलाभिव्यक्तीच्या वेगळ्या प्रकारच्या इयत्तेचं दर्शन!
दिल्लीच्या आर्ट फेअरमधील वेगवेगळ्या गॅलरीजमधील उत्तमोत्तम चित्रं, इन्स्टॉलेशन्स; मुंबईच्या महोत्सवातील कलाबाजार आणि बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शन यातून कलापरंपरा, प्रवाहाचं दर्शन होत होतं. कोची बिएनालेची इयत्ता थोड्या वेगळ्या प्रकारची होती. इथली दृश्यकला केवळ सुंदरतेचं ब्रिद न मिरवता आशय, हेतू, विद्रोह, जाणिवांचं प्रदर्शन करते. त्यामुळे नेहमीच्या प्रदर्शनासारखं हे प्रदर्शन पाहता येत नाही. .......